प्रतिनिधी – अजिंक्य जवळेकर
बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र असणार्या पोहरादेवी गडावरील रामनवमी यात्रा यावर्षिदेखील रद्द करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन तसेच पोहरादेवी गडावरील विश्वस्त मंडळी यांचेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. दरवर्षी रामनवमिच्यादिवशी बंजारा समाजाचे दैवत असणार्या रामनवमी याठिकाणी होत असते. रामनवमिच्या चार ते पाच दिवसांअगोदर यात्रेस सुरुवात होऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून बंजारा समाजाचे भाविक याठिकाणी येत असतात.
मात्र वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता यावर्षिसुद्धा यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीसुद्धा या जन्मोत्सव यात्रेवर कोरोनाचे सावट होते. जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त आढावा बैठकीत विश्वस्त मंडळींच्या ऊपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे धर्मगुरु महंत बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज व महंत सुनिल महाराज ऊपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. निवासी ऊपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, पोलिस अधिक्षक वसंत परदेशी, जि.प. मुख्य कार्यकारी अध्यक्ष वसुमना पंत यांसोबत जिल्हा प्रशासनातील अधिकारी ऊपस्थित होते.