बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरची कार ‘नो पार्किंग’ झोनमध्ये उभी होती. यावर कारवाई करत मुंबई पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे. मुंबई पोलिस ट्रॅफिकच्या बाबतीत फार काटेकोरपणे नियम पाळले जातात. रणबीरकडे आलिशान रेंज रोवर कार आहे. हीच कार मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
राजीव कपूर यांच्या निधनानंतर रणबीर कपूरला मोठा धक्का बसला आहे. चुलते राजीव कपूर आणि रणबीर यांचे नाते खूप छान होते. अखेरच्या दिवसांमध्ये त्या दोघांचे फार बोलणे नव्हते होत. मात्र त्याआधी दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते. वडील ऋषी कपूर यांच्यापेक्षाही राजीव यांच्याशी रणबीरचे अधिक जवळचे नाते होते.
रणबीरच्या चाहत्यांना त्याच्या आगामी ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटांची उत्सुकता आहे. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन , आलिया भट, नागार्जुन, डिंपल कपा़डिया यांचा दमदार अभिनय पहायला मिळणार आहे. तूर्तास मात्र त्याच्या गाडीच्या नो पार्किंगची चर्चा रंगली आहे.