म्हणे राणेंच्या बुरुजाला धक्का देणार ! अरे इथे एकपण चिरा हलला नाही आणि म्हणे धक्का देणार, आमदार नितेशजी राणे यांनी म्हटल्याप्रमाणे राणेंना धक्का देणारा अजून जन्माला यायचा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील भाजपाचे सदस्य फोडून जिल्हा परिषदेत शिवसेना राणेंना धक्का देणार अशी बातमी मागील 2-3 दिवस मीडिया आणि जिल्ह्यात होती. भाजपाच्या गटातील काहींना भेटून आर्थिक प्रलोभने देण्याचाही प्रयत्न सेनेकडून झाला.
राजकारणात वापरल्या जाणाऱ्या साम दाम दंड भेद नितीचा वापर या निवडणुकीत झाला पण या सर्वाला पुरून उरत जशास तसे उत्तर आमदार नितेश राणे यांनी दिले. काल प्रत्यक्षात भाजपाच्या संजना सावंत यांनी 30 विरुद्ध 19 असा शिवसेनेच्या उमेदवाराचा धुव्वा उडवत जि प अध्यक्षपदाचा मान मिळवला. जळगाव आणि सांगलीप्रमाणे फोडाफोडी करून राणेंच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा डाव उधळून लावण्यात आला.
८ सदस्य फुटणार अशी पुडी सोडणार्यांना भाजपाचा एकही सदस्य फोडता आला नाही. यावरून राणेंची तटबंदी किती अभेद्य आहे याचा अंदाज विरोधकांना आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राणेंनी आपला खुंटा हलवून एवढा बळकट केला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत सिंधुदुर्गात फक्त राणेंचा करिष्मा चालतो हे अगदी येरागबाळाही सहज सांगू शकेल. अर्थात त्यामागे राणेंनी 1997 साली जि प ताब्यात घेतल्यापासून ग्रामीण भागाचा केलेला विकास, ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला सर्वार्थाने दिलेली ताकद कारणीभूत आहे. अशी फेसबुक पोस्ट करून नितेश राणे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.