‘पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर’, राणेंचे शिवसेना आमदाराला प्रतिउत्तर

284

शिवसेनेच्या आमदाराने फ’पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर’, राणेंचा शिवसेनेवर डणवीसांवर जहरी टीका केली आहे. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.

दरम्यान, यावर आता शिवसेनेच्या  संजय गायकवाड यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणे यांनी गायकवाड यांना तो प्रयोग प्रथम मुख्यमंत्र्यांवर कर, अशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलं आहे.

लसंजय गायकवाड यांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी “देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांब राहिले. हे या गायकवाडला कोण सांगेल.. पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, कुठे घालायची तिथे घाल”, अशा शब्दात टीका केली आहे. 

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची काल बुलढाण्यात बोलताना जीभ घसरली होती. त्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर यथेच्छ टीका केली होती.  मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यावर नितेश राणे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.