रावसाहेब दानवे शेतकऱ्यांनी माफी मागा, प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

10

दिल्लीच्या बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. त्यातच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं त्यांनी म्हटलंय. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असं ते म्हणाले.

अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अशाच अनोख्या आंदोलनाचा मार्ग पत्करला. औरंगाबाद येथील शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार संघटनेतील कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. गेल्या 24 तासापासून प्रहारचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढून रावसाहेब दानवेंच्या विरोधात आंदोलन करत आहेत.

दानवे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. त्यांनी दिलेल्या वेळेत माफी मागितली नाही तर आम्ही पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु,’ असा आक्रमक इशारा प्रहरच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. दानवेंचे जावई व कट्टर राजकीय विरोधक असलेले हर्षवर्धन जाधव यांनी देखील या कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांचं समर्थन केलंय.