शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही”, असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. दानवे यांच्या या विधानाचा दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट समितीने (DSGMC) निषेध केला आहे.रावसाहेब दानवे यांच्या विधानामुळे शेतकरी आंदोलनावरुन आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.
आता जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये मुस्लिम समाजाला उचवलं गेलं आणि सीएए, एनआरसीमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल असं सांगितलं गेलं. पण एखादा तरी मुस्लिम नागरिक बाहेर गेला का?”, असं रावसाहेब दानवे म्हणाले. जालना जिल्ह्यात एका आरोग्य केंद्राच्या उदघाटनावेळी ते बोलत होते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. जर केंद्रीय मंत्र्याला शेतकरी आंदोलनामागे चीन, पाकिस्तानचा हात असल्याचा सुगावा लागला आहे, त्यांनी संरक्षण मंत्र्यांना तातडीने याची माहिती द्यायला हवी. तसेच चीन आणि पाकवर लगेचच सर्जिकल स्ट्राईक करावा. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि सैन्यदलाच्या प्रमुखांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा, असा टोला लगावला आहे.
दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट समितीचे अध्यक्ष एस. मजिंदरसिंह सिरसा यांनी बुधवारी एक व्हिडिओ संदेश जारी केला. यामध्ये त्यांनी “शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. सरकार मात्र न्याय देण्यात असमर्थ आहे. जे शेतकरी स्वत: देशासाठी लढत आपला जीव अर्पण करतात, अन्नधान्य पिकवतात, ज्यांची मुलेही देशासाठी शहीद होतात, त्यांना देशद्रोही दाखण्याचा प्रयत्न करू नका” असं म्हटलं आहे.