मुंबई मरिन ड्राईव्ह पोलिसांना कॉल जातो सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह येथील एका खोलीचा दरवाजा बाहेरून लॉक होता पण आत राहणाऱ्या मुलीने इन आऊट च्या रजिस्टर वर बाहेर गेल्याची नोंद केली नव्हती. घटनास्थळी पोलीस येतात दरवाजा उघडून बघतात तर १९ वर्षाची एक मुलगी विवस्त्र अवस्थेत मृत आढळते.
मुलीवर बलात्कार करून तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली असे पोलिसांनी प्रथमदर्शनी म्हंटले आहे. अकोल्यातून शिक्षणासाठी मुंबईत आलेली एक मुलगी, परिस्थिती हलकीची असल्यामुळे कॉलेज करता करता पार्ट टाईम जॉब करत होती.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह येथील ही हृदयद्रावक घटना आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता त्यांच्या लक्षात आलं वसतिगृह सुरक्षा राक्षकानेच हे कृत्य केले असल्याचे आढळले कारण मुलीचा बलात्कार आणि हत्या करून तो भल्या पहाटेच ४:३० च्या आसपास वसतिगृहाच्या बाहेर पडला होता. ३२ वर्षीय ओम प्रकाश कनोजिया नावाच्या सुरक्षा राक्षकानेच हा प्रकार केला अशी शंका दाट होती.
मरिन लाईन्स ते चर्चगेट रेल्वे स्टेशन दरम्यान जिटी हॉस्पिटल जवळ रेल्वे पटरीवर कनोजियाचा मृतदेह आढळला या प्रकरणाचा अधिक तपास मरीन ड्राईव्ह पोलीस करताहेत. घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दाखल घेतली व वसतिगृहाच्या सुरक्षेच्या तरतुदी तपासून त्यात आवश्यक ते बदल करायला सांगितले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली.
वसतिगृह शासनाचं पण सुरक्षा मात्र खाजगी का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवारांनाही या प्रकरणाची दखल घेऊन
माध्यमांशी बोलताना सांगितलं
४५० मुलींची व्यवस्था असणारं सावित्रीबाई फुले वसतिगृह परंतु तिथे १० टक्के मुली आताच्या घडीला राहतात त्यात ही एकुलती एक मुलगी ही चौथ्या मजल्यावर राहत होती ज्या व्यक्तीने हे दुष्टकृत्य केलं ती व्यक्ती पहाटेच्या ४-५ च्या दरम्यान ट्रेनखाली आत्महत्या केली ही व्यक्ती तिथे राहत होती त्याला सरकारने नेमलेलं नव्हतं मुलीच्या हत्येचा तपास पारदर्शकपणे व्हावा, निष्पाप मुलीला न्याय मिळाला पाहिजे, मुलीच्या आईवडिलाला न्याय मिळाला पाहिजे
या घटनेनंतर राज्य सरकार ऍक्शन मोडवर सरकारकडून एक सदस्यीय समिती स्थापन, समितीला तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना, डॉ. निपुण विनायक, राज्य प्रकल्प संचालक यांचा समितीत समावेश