प्रसिद्ध रॅपर डिवाइन यांचं नवीन गाणं रिलीज झालं आहे. त्या गाण्याला अवघ्या 24 तासात युट्युबवर 23 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यासाठी डिवाइनने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. सोशल मिडियावर सध्या या गाण्याची चर्चा सुरू आहे. हे ‘मिरची’ गाणं एमसी अल्ताफ, डिवाइन, फिनोम आणि स्टायलो यांनी गायले आहे. या गाण्याचे बोल देखील यांनीच लिहले आहे. या रॅप गाण्याला म्युझिक पिनाकी उतन यांनी दिले आहे.
शनिवारी डिवाइनने ट्विट करून हि माहिती दिली की, या गाण्याला 24 तासात 23 लाख व्ह्यूज मिळाले तर या गाण्याचे आता 37 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज झाले आहेत. ‘गली बॉय’ हा सिनेमा रॅपर डिवाइनच्या जीवावर आधारित होता. यामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होता. लोकांमध्ये आता रॅपची क्रेझ वाढू लागली आहे. सिनेमांमधून प्रेरित होउन तरुण मंडळी देखील रॅप मध्ये करीयर करण्याच्या विचारात आहेत.