साऊथ इंडस्ट्रीतील रश्मिका मंदना ठरली ‘नॅशनल क्रश ऑफ 2020’

2

  साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदना हिने टॉलीवूडसोबत बॉलीवूडमध्ये देखील स्वतःची छाप उमटवली आहे. साऊथमध्ये अनेक अभिनेत्री सुंदर आहेत परंतु रश्मिकाने कमी काळात सर्वांचे मन जिंकले आहे. रश्मिका सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे.

आता रश्मिका मंदनाची प्रसिध्दी केवळ साऊथ नाही तर राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. नुकताच गुगलने रश्मिकाला नॅशनल क्रशचे टॅग दिले आहे. भारतातील अनेक तरुणपिढीला रश्मिकाची फॅन आहे. रश्मिकाचे चाहते या बातमीमुळे खूप आनंदात आहेत.

‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया’ 2020 चा ‘किताब रश्मिका मंदनाने पटकवला आहे. त्यामुळे सध्या सोशल मिडियावर #NationalCrushRashmika हा ट्रेंड चालू आहे.

2016 साली प्रदर्शित झालेल्या ‘किरिक पार्टी’ या चित्रपटामधुन तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. रश्मिकाचा हा पहिलाचं चित्रपट खूप गाजला आणि सुपरहिट ठरला. 2017 मध्ये तिने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली तिथेही रश्मिकाचा चाहता वर्ग खूप वाढला. यानंतर रश्मिकाने ‘गीता गोविंद’ मधील आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं. हा चित्रपटही सुपरहिट ठरला.

यापूर्वी रश्मिकाला कर्नाटक क्रश म्हणून ओळखले जात होते आता रश्मिका नॅशनल क्रश म्हणून ओळखणार आहे. रश्मिकाचा चाहतावर्ग यामुळे खूप आनंदात आहे. सध्या यावर ट्विटस् आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.