इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत स्वाभिमानी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज बारामती -इंदापूर रस्त्यावर भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखान्यांसमोर कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रातील २.५ कोटी विजग्राहकांवर लादण्यात आलेल्या अन्यायकारक विजबिला विरोधात छेडण्यात आले आहे.
यावेळी करीकर्त्याडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.सक्तीनं विजबिल वसुली विरोधात आंदोलन सुरू असून बारामती इंदापूर रास्ता रोकण्यात आला आहे. यामुळे कारखान्यांसमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत.