कृषी कायदे रद्द करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनांचे रास्ता रोको आंदोलन

18

कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आज देशभरात ‘चक्का जाम’ आंदोलन करत आहेत. संयुक्त किसान मोर्चाने आज दुपारी 12 ते दुपारी 3 या वेळेत देशभर चक्का जाम करण्याची घोषणा केली आहे. तसेच आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी निघणार्यांना दाबण्यासाठी ठिक-ठिकाणी रस्त्यात खिळे रोवण्यात आले आहेत. तसेच आंदोलन परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलेल्या आहेत.

बालेवाडी फाटा येथे शनिवारी दि.६ सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. शेतकरी विरोधी तीनही कृषी कायदे रद्द करावेत, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालास दीडपट हमीभाव मिळावा आणि कोरोना काळातील वाढीव वीज बिल माफ करावे या मागणीसाठी स्वाभिमानी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन केले आहे.

स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. यावेळी हनुमंत बालवडकर, अमित कुदळे, सोमनाथ शिंदे, देविदास ववले, सोपान खाणेकर, दिलीप बालवडकर, नरेंद्र बालवडकर, ऋषीकेश शिंदे आदींसह अन्य शेतकरी उपस्थित होते.