पुणे महापालिकेत गेल्या दोन आठवड्यांपासून सरासरी रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांच्या विश्लेषणातून स्पष्ट होते.
पुण्यात गेल्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाच हजार ६२८ रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते. ही संख्या अवघ्या पाच आठवड्यांमध्ये ३४ हजार रुग्णांनी वाढली. ५ ते ११ एप्रिल या आठवड्यात ३९ हजार ७१७ पर्यंत नोंदली गेली.
पुण्यात ११ फेब्रुवारीनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाबाधितांचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. पुण्यात ५ ते ११ एप्रिल या आठवड्यात सर्वाधिक रुग्णसंख्या होती. ती आता कमी होत असल्याचे दिसते.