चीनच्या सिनोफार्म या कोविड लशीला पाकिस्तानात आपत्कालीन वापरास मान्यता दिली असून, पाकिस्तानात कोरोणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणत वाढत आहेत. पाकिस्तानी औषध नियंत्रक प्राधिकरणाने सोमवारी या लशिला मान्यता दिली. याआधी ऑक्सफर्ड अस्त्रिझेनेका यांच्या लसेला मान्यता दिली होती.
पाकिस्तानी औषध नियंत्रक प्राधिकरणाचे प्रमुख डॉ. असीम रौफ यांनी सांगितले की सिनोफर्म यांच्या लशीला राष्ट्रीय आरोग्य संस्थेने परवानगी दिली होती. त्यामुळे आपत्कालीन वापरास या लशिला पाकिस्तानात परवानगी देण्यात येत आहे.
पाकिस्तानने या लसीच्या १.१ दशलक्ष मात्रांची मागणी केली आहे. ही लस चीनकडून आयात केली जाईल. सध्या पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पाकिस्तानी सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असून, उपाय योजना करण्यासाठी विविध देशांकडे हात पसरवायला पाकिस्तानने सुरुवात केली आहे.