सरकारच्या रक्तदान शिबीरांत विक्रमी रक्तदान!

89

शिवस्वराज्यभिषेक दिन व स्व. माजी आ. प्रकाश डहाके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कारंजा येथील सरकार गृपच्यावतीने ६ जुन रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरांत १११ युवकांनी रक्तदान करीत कारंजात विक्रमी रक्तदानाची नोंद केली आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहराची अोळख संवेदनशील शहर म्हणून आहे. वाशिम जिल्ह्यात सर्वाधीक रक्तदान शिबीराचे आयोजन हे कारंजात होत असते. विशेष म्हणजे कारंजा शहरात आतापर्यंत झालेल्या रक्तदान शिबीरांपैकी सर्वाधीक रक्तदान हे सरकार गृपच्या नावे नोंदवले गेले आहे.

गुरुमंदिर संस्थानचे अधक्ष नारायण खेडकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार धीरज मांजरे व रा.स्व.संघाचे जिल्हा सहकार्यवाह विजय कदम कार्यक्रमास ऊपस्थित होते. यावेळी तहसिलदार धीरज मांजरे व विजयजी कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी देवदव्रत डहाके व कौस्तुभ डहाके यांनीसुद्धा शिबीरांस भेट दिली.

सरकार हे कारंजा शहरातील तरुणांचे संघटन असून कारंजातील सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. यावर्षिचे सरकार गृपचे रक्तदान शिबीराचे दुसरे वर्ष होते. शहरातील नव्याने निर्माण होणार्‍या या युवाशक्तीच्या पाठीमागे शहरातील अनेक सामाजिक बांधीलकी जपणारे खंबीरपणे ऊभे असल्याचेसुद्धा यावेळी निदर्शनास आले. सरकार गृपचे अध्यक्ष विक्की चौधरी व स्वप्निल शिंदे, भारत तोडकर या सदस्यमंडळींनी सर्व रक्तदात्यांचे, पाहुण्यांचे व ऊपस्थितांचे आभार मानले. गुरुमंदिर रुग्णवाहिका चालक रमेश देशमुख यांनी कार्यक्रमाची सांगता केली.