‘जगभर महाराष्ट्राच्या कामाची नोंद; मुंबई मॉडेलची चर्चा होतेय हे फडणवीसांना पचत नाही’

8

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. जगभर महाराष्ट्राच्या कामाची नोंद लोक घेत आहेत. मुंबई मॉडेलची चर्चा होतेय हे पचत नसल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचे काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

कोरोनाच्या बाबतीत गंभीरतेने राज्य सरकार काम करत आहे. कोरोना पॉझिटिव्हचा आकडा किंवा मृतांचा आकडा लपवला नाही.

राज्यात ६ हजार २०० लॅब तयार करण्यात आले. जास्तीत जास्त आरटीपीसीआरच्या टेस्ट करण्यात आल्या. ही सर्व माहिती उघडपणे जनतेसमोर ठेवल्याचे मलिक यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्ट असेल किंवा इतर न्यायपालिका असतील तसेच नीती आयोग यांनी महाराष्ट्रातील कामाची प्रशंसा केली हेच विरोधी पक्षनेत्यांना पचत नाही, अशी खोचक टीकाही नवाब मलिक यांनी केली.