बिहारमध्ये पुन्हा हाथरस घटनेची पुनरावृत्ती

6

21 जानेवारी रोजी झालेल्या घटनेची तक्रार 2 दोन फेब्रुवारीला नोंदवली. एकूण 11 आरोपींचा उल्लेख करण्यात आला.बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यात ‘हाथरस’ सारख्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. याठिकाणी 12 वर्षांच्या नेपाळी मुलीवर कथित सामूहिक बलात्कार आणि नंतर हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जो ऑडिओ व्हायरल झाला आहे त्यानुसार स्टेशन प्रमुख संजीव कुमार रंजन यांचा निष्काळजीपणा आणि त्यांनी कर्तव्य न बजावल्याचे स्पष्ट होते. त्यांना निलंबित केले आहे. चौकशीदरम्यान साक्षीदाराचा जबाब नोंदवल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र झा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले.

पूर्वी चंपारण येथील सिकहना, विभागीय पदाधिकाऱ्यांना सुरेश यांनी दिलेल्या निवेदनानुसार, “संध्याकाळी चार वाजता माझा मुलगा बाजारातून घरी येत असताना घरमालकाने त्याला थांबवले. पण तरीही मुलगा घरी पोहचला. आपली बहीण जखमी अवस्थेत त्याला आढळली. मुलाने मला घरी बोलवले. मुलीच्या गळ्याला लाल डाग होते. तिला घेऊन मी स्थानिक डॉक्टरांकडे पोहचलो पण त्यांनी उपचार केले नाहीत.

नेपाळच्या बारबर्दिया इथं राहणारे सुरेश (बदललेले नाव) गेल्या सात वर्षांपासून मोतिहारी येथील कुंडवा चैनपूर येथे मजुरी करतात. ही घटना 21 जानेवारी रोजी घडल्याचं सुरेश सांगतात. त्यांची पत्नी नेपाळमध्ये आपल्या गावी गेली होती. 

याप्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर 5 फेब्रुवारीला एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. 21 जानेवारीला कुंडवा चैनपूर पोलीस स्टेशनचे प्रमुख संजीव कुमार रंजन आणि आरोपी रमेश साह यांच्यातील संभाषण या क्लीपमध्ये आहे.

याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी विभागीय पोलीस पदाधिकारी सिकहरना यांच्या नेतृत्त्वात SIT स्थापन केली आहे.”पोलीस अधीक्षक नवीनचंद्र झा यांनी बीबीसीला सांगितले