मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे.
अजित पवार म्हणाले कि,“महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे आली आहे. गेल्या एक वर्षापासून यावर काम सुरु आहे. या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करु आणि मार्ग काढू,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुण्याचं नाव बदलण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केल्याबद्दल त्यांना विचारण्यात आलं त्यावर अजितदादा पवार म्हणाले की, “कोणी काय मागणी करावं हा ज्याच्या त्याचा आधिकार आहे. एका शहराचा मुद्दा आला तर दुसऱ्या शहरांचाही उल्लेख होतो. मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. महाविकास आघाडी टीकावी आणि विकासाला महत्व द्यावं ही शरद पवारांची भूमिका असून आम्हीदेखील त्याचं समर्थन करुन पुढे जात आहोत”.