उद्यापासून राज्यातील सर्वच कनिष्ठ न्यायालयांमध्ये नियमित सुनावणी होणार सुरू 

5

मिशन बिगीन अगेन अंतर्गतच उच्च न्यायालय आणि काही कनिष्ठ न्यायालयांना सुनावणी सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पण, खटल्यांच्या संख्येमुळे कनिष्ठ न्यायालयांचे कामकाज पूर्णपणे सुरळित नव्हते. उच्च न्यायालयात फिजीकल सुनावणी सुरू झाली आहे.

उच्च न्यायालयाच्या नियमित रोस्टरमध्ये काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्या न्यायपीठासमक्ष दिवाणी रिट याचिका, फौजदारी रिट याचिका आणि फौजदारी अपील संबंधी याचिकेवरील सुनावणी होईल

१ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र, गोवा, दादर आणि नगर हवेली तसेच दमण व दीव या सर्व कनिष्ठ न्यायालयात नियमित सुनावणी सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. सोबतच प्रकरणे निकाली काढताना सुरक्षेची प्रत्येक उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला. खबरदारी म्हणून न्यायालयाचे कामकाजही थांबवावे लागले होते. त्यानंतर मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक कामांना सूट देण्यात आली

संक्रमण टाळण्यासाठी उच्च न्यायालय व सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचीही सुचना करण्यात आली आहेन्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्यासमक्ष दिवाणी रिट याचिका, सीआरए, प्रथम अपील यावर सुनावणी होईल. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमक्ष सीआरपीसीच्या कलम ४०७ अन्वये दाखल गुन्हेगारी अर्ज आणि सर्व गुन्हेगारी अपिलांवर सुनावणी होईल.