तीन अपत्यांमुळे नाकारले शिवसेनेच्या नगरसेविकेचे पद

12

2017 साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये भाजपच्या भाग्यलक्ष्मी म्हंता यांचा पराभव करुन शिवसेनेच्या अनिता मगर निवडूण आल्या होत्या. मात्र मगर यांना तीन अपत्ये असून त्यांचे नगरसेवक पद रद्द कऱण्याची मागणी म्हंता यांनी न्यायलयाकडे केली होती.

मगर यांना तीन अपत्ये असून तिसरे अपत्य हे 12 सप्टेंबर 2001 नंतरचे असल्याचे कारण देत उच्च न्यायलयाने त्यांचे पद रद्द केले असल्याचा निकाल दिला आहे. 

अनिता मगर यांनी या निकालाविरोधात धाव घेत मुंबई उच्च न्यायलयात रीट याचिका दाखल केली होती. मात्र म्हंता यांच्या वकीलांना कोर्टात सादर केलेले पुरावे आणि युक्तीवाद ग्राह्य धरत उच्च न्यायलायने सोलापूर न्यायलयाचा निकाल कायम ठेवला. 

उच्च न्यायलयाने त्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवत याचिका फेटाळून लावली आहे, अशी माहिती भाग्यलक्ष्मी म्हंता यांचे वकील अॅड. अजित आळंगे यांनी दिली.

अनिता मगर यांना मुंबई उच्च न्यायलयाच्या या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायलायत धाव घेण्याची संधी आहे. त्यासाठी उच्च न्यायलयाने चार आठवड्यांचा कालावधी दिला आहे
.