परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील सारी वार्डातील रुग्णाचा ऑक्सीजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी आज भल्या पहाटे जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रचंड गोंधळ घालत वैद्यकीय अधिकार्यांना धारेवर धरले.
रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे. शहरातील परसावतनगरातील 65 वर्षीय व्यक्तीची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सारी वॉर्डात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
त्यांची प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना ऑक्सीजन दिल्या गेले नसल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी करत तेथे चांगलाच गोंधळ घातला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अधिकारी – कर्मचार्यांना मृत्यूचे नेमके कारण विचारण्याचा प्रयत्न केला असता तेथून कर्मचार्यांनी पळ काढल्याचा दुर्दैवी प्रकारही समोर आला.
वैद्यकीय अधिकारी – कर्मचार्यांनी तेथून पळ काढल्याने रुग्णाचे नातेवाईक चांगलेच भडकले होते. यावेळी नानलपेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले.