रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या इंजेक्शनची मागणी वाढण्याचं कारण म्हणजे हा कोरोनावर उपचार समजला जात आहे. मात्र, जागितिक आरोग्य संघटनेनं (WHO) ही गोष्ट मान्य केलेली नाही.
WHOचे मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथ आणि कोविडच्या टेक्निकल हेड डो मारिया वेन केरखॉव्ह यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
WHOनं म्हटलं आहे, की असा कोणताही पुरावा नाही, की हे इंजेक्शन कोरोना रुग्णांवर उपचारासाठी उपयोगी आहे.देशात या इंजेक्शनची मागणी वाढण्यासोबतच पुरवठादेखील कमी पडू लागला होता.
WHO नं कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हे इंजेक्शन न वापरण्याच्या सूचना मागील वर्षी दिल्या होत्या. तर, डॉ. वॅन कॅरखॉव्ह यांचं असं म्हणणं आहे, की या इंजेक्शनचं मोठं केमिकल ट्रायल केलं जात आहे. काही प्रकरणांमध्ये या इंजेक्शनमुळे भरपूर सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं आहे.