रेमडेसिव्हीर हे जीवनरक्षक औषध नाही, उपलब्ध नसल्यास ‘हा’ पर्याय ? राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंचा व्हिडीओ

109

रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. शरीरातील विषाणूंचा भार कमी करण्यासाठी ते दिलं जातं. परंतु जर ते उपलब्ध झालं नाही तर कोविड टास्क फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर सुचविलं आहे. ते रुग्णाला द्यावं.

शासन व प्रशासन रेमडिसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यासंबंधी राष्ट्रवादीचे मावळचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे.


परंतु सातत्याने वाढती रुग्णसंख्येमुळे याला मर्यादा येत आहेत. हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचविलेली औषधे रुग्णांना देता यावीत. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. त्यामुळे ते रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी.

यासोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरुन गरज असणाऱ्या रुग्णांनाच हे इंजेक्शन दिले जावे अशी माझी नम्र विनंती आहे. असही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.