साऊथची साई पल्लवी आठवतेय? तिचा ‘हा’ चित्रपट पहाच…

72


साऊथची साई पल्लवी आठवतेय. अठवणारच कारण मराठीत सई ताम्हणकरची जितकी क्रेझ आहे तितकीच, किंवा त्यापेक्षा काकणभर अधिक तिची क्रेझ साऊथसह देशात आहे. तिची आठवण काढण्याचं कारण इतकचं “फिदा” नावाचा तिचा साऊथ मूव्ही आज पहिला. साई पल्लवीच्या सौंदर्याबाबत आणि अभिनयाबद्दल वेगळं लिहिता येईल. तूर्तास मोह टाळून त्याला ब्रेक देतोय. पण तिचा अभिनय असलेला “फिदा” पाहणं म्हणजे कौटुंबिक मनोरंजनाची १००% हमी, गुलाबी गुलाबी सगळं…

DDLJ, हम आपके हैं कोण, विवाह हे चित्रपट तुम्हाला आवडले असतील तर फिदा एन्जॉय करायाला हरकत नाहीय. “फिदा” पहिला की “विवाह” चित्रपटाची आठवण येते. हा तोच तो शहीद कपुरचा शादी वैगेरे चा माहोल, मुलामुलीचा पाहण्याचा कार्यक्रम, लग्न आणि सगळा हवाहवासा वाटणारा सोहळा. आणि त्यासोबत फिरत राहणारी अलवार प्रेमकथा. कौटुंबिक सोहळा पडद्यावर म्हणजे तो हवाहवासा वाटणार यात काही दुमत असण्याच कारण नाही. हा संदर्भ सांगण्याच कारण इतकचं की विवाह तुम्हाला आवडला असेल तर “फिदा” आवडणं क्रमप्राप्त आहे..

वरून तेज, साई पल्लवी यांचे मुख्य पात्र असलेला “फिदा” गावासह अमेरिका फिरून आणतो. अमेरिकेतील तीन भाऊ भारतातील खेड्यात येतात. मोठ्या भावासाठी बायको, अर्थात स्वतःसाठी वहिनी पाहण्यासाठी, लगेच लग्न करून घेऊन जातात. त्यासोबत चालणारी नवरदेवाचा भाऊ आणि नवरीची बहीण यांची ही गुलाबी लव्ह स्टोरी आहे. नवरदेवा सोबत आलेल्या त्याच्या भावाला आधी छळून नंतर प्रेम करणं असा टिपिकल ड्रामा या सिनेमात आहे….

साई पल्लवीचा अभिनय म्हणजे तोड नाही. चित्रपट संपूच नये असं वाटत राहतं. इतकी जादू आहे चित्रपटात. नक्की पहा यू ट्यूब हिंदी डब मूव्हीआहे.


– Rohit GirI : 9604312182