‘त्या’ जुन्या आश्वासनाची आठवण करून देत आशिष शेलारांचा शिवसेनेला सवाल

27

शिवसेनेनं दिलेल्या एका आश्वासनावर भाजपानं बोट ठेवलं आहे. भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी जुन्या आश्वासनाची आठवण करून देत ‘जे बाणेदार वचन दिलं, त्याच काय झालं?,” असा सवाल केला आहे.

सुटलेला बाण आणि दिलेला वचनाचा शब्द परत घेता येत नाही, असे म्हणतात. मग, मुंबईकरांना 500 चौरस फुटा पर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याचे जे “बाणेदार वचन” दिले त्याचे काय झाले? टाटा,जावई,मुलाला वाटून झाले असतील तर आता आमच्या सामान्य मुंबईकरांची आठवण येऊ द्या!,’ असा टोला शेलारांनी शिवसेनेला लगावला आहे.

यंदा मालमत्ता कराअंतर्गत येणाऱ्या १० करांपैकी केवळ सर्वसाधारण कर माफ केला जाणार असून, इतर ९ कर मात्र भरावे लागणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावरूनच आशिष शेलार यांनी सवाल उपस्थित केला आहे.मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण मालमत्ता करमाफी दिल्यानंतर यंदा मात्र महापालिका प्रशासनाने यू टर्न घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं.