पुण्यातील खळबळजनक घटना, लग्नाचे आमिष दाखवून आतेभावाने केला वारंवार बलात्कार

3

पुण्यात एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भावा बहिणींच्या नात्याला कलंक लावणाऱ्या घटनेचा निषेध करावा तितका कमी आहे. याप्रकरणी सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. लग्नाचे आमिष दाखवून स्वतःच्या आत्तेभावाने वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबाने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तरुणी घरी एकटी असताना गप्पा मारण्याच्या बहाण्याने आत्ते भाऊ घरी येत होता. त्याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तरुणीवर बलात्कारही केला आणि घरच्यांना न सांगण्याची धमकी सुद्धा दिली. दरम्यान, या सगळ्या प्रकारातून पीडित तरुणी गर्भवती राहिली आणि 31 ऑक्टोबरला तिची प्रसूती करण्यात आली. आतेभावानं घरच्यांना न सांगण्याची धमकी दिल्यानं तरुणीनं ही बाबा कुटुंबियांपासून लपवून ठेवली. मात्र प्रसूतीनंतर सगळा प्रकार समोर आला कुटुंबियांना न्याय मागण्यासाठी पोलिसात धाव घ्यावी लागली. या प्रकरणी कोळेवाडी इथे राहणारा आरोपी सचिन विठ्ठल झोरे या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.