या जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांची लिलाव बंद ठेवण्याची विनंती

11

नाशिक मधील अभोणा येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत गुरुवार ते शनिवार कांदा लिलाव बंद राहणार आहेत. अभोणा परिसरात सर्वत्र कांदालागवड सुरू असल्याने कारणाने कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उपबाजार समितीत काम करणारे सर्व कामगार कांदालागवडीच्या कामात आहेत. त्यानुसार पुढील तीन दिवस कांद्याचे लिलाव बंद राहतील. अशी माहिती कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार व सचिव रवींद्र हिरे यांनी दिली.

17 डिसेंबर ते 19 डिसेंबर कांदा लिलाव बंद राहणार आहेत. येथील उपबाजार समितीत कांद्याचा तुटवडा भासत आहे. मागील एक-दोन दिवसांत कांद्याची मागणी अचानक वाढली आहे. सुमारे ३५० वाहनांची आवक असल्याने मजुरांअभावी कांद्याची उचल करणे व्यापाऱ्यांनाही शक्य होत नव्हते. तसेच बाजारात नव्या लाल कांद्याची आवक वाढत असल्याने उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये घट आणि वाढ होत आहे. एक ते दीड महिन्यापासून कांद्याच्या दरात चढउतार सुरू आहे. पाच ते आठ हजार रुपयांवर गेलेले दर दिवाळीनंतर कमी होऊ लागले आहेत. यासाठी सर्व कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवण्याची विनंती कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली.