काळबादेवी आणि गिरगावमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा सुधारीत आराखडा आणि कराराचा मसुदा रहिवाशांना दाखवण्यात यावा : शिवसेना

14

काळबादेवी, गिरगावमधील अनेक जुन्या इमारती मेट्रो-3 प्रकल्पामुळे बाधित झाल्या आहेत.इमारतींच्या पुनर्विकासाचा सुधारीत आराखडा आणि कराराचा मसुदा रहिवाशांना दाखवण्यात यावा तसेच त्यांना विश्वासात घेऊनच पुनर्विकास केला जावा अशी मागणी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी आज मुंबई मेट्रो रेल महामंडळाकड केली. 

रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई आणि विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांच्या शिष्टमंडळाची एमएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्यासोबत बैठक झाली.

त्याप्रसंगी शाखाप्रमुख निलेश अहिरेकर, सुहास मांजरेकर, सुजित भोर, गुरुनाथ शेटय़े, केतन परब, हर्षदा कदम, प्रिती शहा आदी उपस्थित होते.

झालेल्या बैठकीत रहिवाशांनी उत्तराधिकारी प्रमाणपत्र, पात्र-अपात्र रहिवाशांवर असलेल्या कायदेशीर केसेस, प्री मेन्टेनन्स, कॉर्पस फंड आदी विविध मुद्दे मांडले.