सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावालांच्या जीवाला धोका? केंद्रीय गृह मंत्रालयाने पुरवली ‘वाय’ दर्जाची सुरक्षा

44

जागतिक कोरोना संकटामुळे देश हतबल झाला आहे. सध्या देशात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्यामुळे  लस उत्पादन करणारी सिरम इन्स्टिट्यूट सर्वांच्या केंद्रस्थानी आली आहे.

याच अनुषंगाने सिरम कंपनीचे सीईओ अदार पुनावाला यांच्या जिवीताला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने आदर पूनावला यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

जगातील सर्वात मोठी लस उत्पादन करणारी कंपनी म्हणून पुण्यातील सिरम कंपनी प्रसिद्ध आहे. सोबतच दिवसेंदिवस  कंपनीचे सीईओ आदर पूनावाला यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी त्यांना ही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

पुनावाला यांच्या संरक्षणार्थ आता ‘वाय’ दर्जाचे सुरक्षा कवच तैनात असेल. पूनावाला यांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलिस बल म्हणजेच सीआरपीएफवर सोपवण्यात आली आहे. पुनावाला यांच्यासोबत 24 तास 11 जवान तैनात असणार आहेत.