जगभरात कोरोना विषाणूचे नवीन स्ट्रेन येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनिश्चिततेचे वातावरण आहे. कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लशीची खुल्या बाजारातील किंमत इतर देशांच्या तुलनेत भारतात जास्त असल्याची चर्चा माध्यमांद्वारे होत आहे.
लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने स्पष्टीकरण दिलं आहे. यामध्ये सरकारच्या लसीकरण मोहिमेसाठी ही लस माफक दरात उपलब्ध करुन देण्यात आली असून, फक्त मोजक्या खासगी वितरणासाठी ती ६०० रूपयांना विकली जाणार आहे, असं सीरमनं म्हटलं आहे.
तसेच बाजारात सध्या उपलब्ध कोरोना उपचार पद्धती आणि औषधांच्या तुलनेत ही लस स्वस्त असल्याचे पुनावाला यांनी म्हटले आहे. देशासह जगभरातील लसीकरणासाठी आम्ही उत्पादक कंपनी म्हणून कटिबद्ध असल्याचंही पुनावाला यांनी म्हटलं आहे.