सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राजेनेकाद्वारे विकसित करण्यात आलेल्या कोरोनावरील कोविशिल्ड या लसीचे उत्पादन करत आहे. भारतामध्ये या लसीच्या वापराला पहिल्यांदा मान्यता मिळाली होती.
अमेरिकेसह युरोपमधील काही देशांनी कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याने कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या भारतातील सिरम इन्स्टिट्युटसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पूनावाला यांनी ट्विट करून अमेरिकेमधून निर्यात होणाऱ्या कच्च्या मलावर लादलेले निर्बंध हटवण्याची विनंती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष महोदय, जर कोरोना विषाणूला हरवण्यासाठी खऱ्या अर्थाने एकजूट व्हायचं असेल तर अमेरिकेच्या बाहेरील लस उद्योगाकडून मी तुम्हाला विनंती करतो की, अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या कच्च्या मालावर घालण्यात आलेले निर्बंध हटवा. जेणेकरून कोरोनाविरोधातील लसींचे उत्पादन वाढवता येईल. तुमच्या प्रशासनाकडे याबाबतची पूर्ण माहिती आहे.असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.