मोठ्या संख्येने भारत बंदला प्रतिसाद द्या: राजू शेट्टी

20

केंद्र सरकारने देशावर लादलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. दरम्यान या आंदोलकांना पोलिसांकडून आडवण्यात आले आहे. पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांच्या दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यभरात आंदोलन सुरू आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रसरकारवर जोरदार टीका केलेल्या आहेत. दिल्लीच्या दिशेना जाणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिस अडवत आहेत. शेतकरी काय आतंकवादी आहेत का असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला केला आहे. यावेळी शेट्टी पुढे म्हणाले की. मंगळवार दि. 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या भारत बंद आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने उतरणार आहे. याचबरोबर इतर सर्वांनी देखील हा बंद पाळून या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन ही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

राजू शेट्टी पुढे म्हणाले की, आम्हाला अडवण्यासाठी केंद्र सरकारने रस्ता खणला आहे. यांसारख्या गोष्टी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना अडवण्यासाठी केल्या जात आहेत. आम्ही अतिरेकी आहोत का? आम्हाला का दिल्लीला जाण्यापासून रोखले जात आहे. कृषी विधेयक लागू झाल्यानंतर शेतकरी हे अडानी आणि अंबानी यांचे गुलाम होतील. तसेच कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.