मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांमधील करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत घटली आहे.कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जातील,’ अशी माहिती टोपे यांनी दिली असल्याचे एका वृत्त वाहिनीने दिले आहे.
राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे ३१ मेनंतर लॉकडाऊन संपणार का, असा प्रश्न पडला असताना याचे उत्तर खुद्द आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिले आहे.
१ जूनपासून हळूहळू शिथिल केले जातील. निर्बंध एकदम मागे घेण्याऐवजी टप्प्याटप्यानं मागे घेतले जातील. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांसाठी या प्रकारचे निर्णय घेतले जातील,’ अशी माहिती टोपेंनी दिली.