राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होतो आहे. गेल्या २४ तासात राज्यात ८ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहे. मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी जनतेस कोरोना नियमांचे कसोशीने पालन करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमिवरच कॉंग्रेसचे नेते महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वाचे संकते दिले आहे. कोरोनाचा वेग असाच कायम राहिल्यास निर्बध अधिक कठोर करावे लागतील. असे पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
पुन्हा नव्याने सुरु झालेल्या कोरोना प्रसाराचा केंद्रबिंदू यंदा विदर्भातील अमरावती हे ठरले. मात्र आता संपूर्ण राज्यभरात हीच परिस्थिती असल्याचे आढळते आहे. मुंबई आणि नागपुरमध्येसुद्धा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमिवरच स्थानिक प्रशासनाच्यावतीने जागोजागी निर्बध लावण्यात येत आहे. विजय वडेट्टीवार यांनी यावरच भाष्य केले आहे.
मुंबईत लोकल पुर्णपणव बंद न करता गर्दी टाळण्यासाठी गाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागेल. राज्यात रुग्णांमध्ये विद्यार्थ्यांचेसुद्धा प्रमाण वाढत आहे. अशावेळी सरव परिक्षा या अॉनलाईन घ्याव्यात या विचारात सरकार असणार आहे. तसेच मंगल कार्यालय आणि समारंभांवर निर्बंध आणले असले तरिसुद्धा लोक अजूनही बिनधास्त वागत आहे. सेलीब्रिटी आणि राजकारणी यांच्या सारंभास सगळ्या नियमांना धाब्यावर बसवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मंगल कार्यालातील गर्दी कमी होईल याकवर विशेष लक्ष ठेऊन अधिक कठोर पाऊले ऊचपावी लागणार आहेत.