भारतातून ब्रिटनला प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध

6

भारतातील कोरोनाचं संकट पाहता ब्रिटनकडून भारताची नोंद रेड लिस्टमध्ये करण्यात आली आहे. सदर यादीत नोंद झाल्यामुळं आता भारतीय आणि आयरिश नागरिकांना भारतातून ब्रिटनमध्ये जाण्यावर निर्बंध असतील.

ब्रिटनकडे जाणारी सर्व उड्डाणं 24 ते 30 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. ही माहिती एयर इंडियाच्या वतीने देण्यात आली आहे.आता दोन देशांदरम्यान व्हर्च्युअल मीटिंगचे आयोजन करण्यात येणार आहे.

परदेशातून परतलेल्या ब्रिटनच्या नागरिकांनाही इथं एका हॉटेलमध्ये 10 दिवसांसाठी विलगीकरणात रहावं लागणार आहे. ब्रिटनमध्ये भारतात आढळलेल्या संसर्गाच्या प्रकारचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी अधिक रुग्ण हे परदेशातून परतलेले आहेत.