जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज कोरोना संसर्ग आढावा बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जे निर्बंध लावले आहेत ते अधिक कडक करावेत. तसेच स्व. क्रांतिसिंह नाना पाटील साधारण आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढवून कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.
या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थित होते.
सध्या जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असून कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही, तसेच रुग्णास सहजपणे बेड उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.