पुणे मार्केटयार्डात किरकोळ विक्रेत्यांना बंदी

4

गेल्या आठवड्यात सकाळच्या वेळेत मार्केटयार्डमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. त्यावेळी होणाऱ्या कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक आहे. 

मार्केट यार्डातील विविध विभागात माल घेऊन येणार्‍यांची संख्या मोठी आहे. तसेच खरेदी करणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे येथे गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाळीनुसार पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 

बाजारातील किरकोळ विक्रेते, डमी व लिंबू विक्रेत्यांवर सोमवारपासून बंदी घालण्यात आली आहेरिक्षाला प्रवेश दिला जाणार नसून पास असेल, तरच बाजारात प्रवेश दिला जाणार आहे. किरकोळ विक्रीही थांबवण्यात आली आहे.

आडते आणि खरेदीदारांना बाजार समितीकडून पास दिले जातील. प्रवेशद्वारावर ओळखपत्र आणि पास दाखविल्याशिवाय बाजारात प्रवेश दिला जाणार नाही. अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.