सुशांत सिंहच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबावर आणखी एक संकट

10

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतला आजही त्याचे चाहते त्याला आठवत आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणानंतर त्याचे वडील केके सिंह यांनी मुलाला न्याय मिळावा म्हणून बरेच प्रयत्न चालू ठेवले होते. त्याचे वडिल केके सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत सध्या बिघडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना हृदयाशी संबंधित आजार असल्याचे समजत आहे.

त्यामुळे त्यांना हरियाणाच्या फरीदाबाद येथील आशियाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता त्यांची प्रकृती चांगली आहे. सुशांतच्या वडिलांचा एक फोटो सोशल मीडियाद्वारे समोर आला आहे. या फोटोमध्ये ते रुग्णालयात दिसत आहेत. या फोटोमध्ये स्वत: केके सिंह आणि सुशांतच्या बहिणी प्रियांका आणि मितू सिंह दिसत आहेत. त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
हा फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानी यानं त्याच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.