सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची गरज आहे: जयंत पाटील

3

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील जलसंपदा विभागाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा देखील घेतला आहे. 

राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पलटवार केला आहे. जयंत पाटील म्हणाले की, सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची गरज आहे, त्यामुळे ते अशाप्रकारचे निराधार आरोप करत आहेत.

देशात कोरोना साथीमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह खासगी शिक्षण संस्थाही अडचणीत आल्या असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. तसेच यावर मार्ग काढण्यासाठी मधला मार्ग स्विकारणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस हे तीनही पक्ष एकत्र चर्चा करून निर्णय घेतील, असंही जयंत पाटीलांनी म्हटलं आहे. यावेळी आमदार अमोल मिटकरी आणि आमदार नितीन देशमुखही उपस्थित होते.