नव्या वर्षात रिया चक्रवर्तीचे होणार कमबॅक

10

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्ज केसमध्ये अटक झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने काही दिवसांपासून काम बंद केले होते. येत्या नव्या वर्षात रिया देखील नवी सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. रिया 2021 मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्तीचा जवळचा मित्र रुमी जाफरी याने एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे.

रुमी जाफरीने नुकतीच स्पॉटबॉयला एक मुलाखत दिली होती, त्यामध्ये अस सांगितलं की ‘हे वर्ष रियासाठी अत्यंत धक्कादायक ठरले आहे. हे वर्ष तर सर्वांसाठीच वाईट होतं. मात्र, तिच्यासाठी हा धक्का खूप मोठा होता. रियाला या वर्षात अनेक धक्के सहन करावे लागले. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगी तुरूंगात महिना घालवते तेव्हा तिच्या मनावर काय आघात होत असतील याची तुम्ही कल्पना करू शकता.

दरम्यान, जाफरी यांनी रियाला आश्वासन दिलं आहे की, संपूर्ण इंडस्ट्री तिचं स्वागत मनापासून करेल. नुकतीच त्यांची भेट रियाशी झाली आहे. ती खूप शांत होती आणि जास्त बोलत नव्हती. ती खूप निराश असल्यासारखी वाटत होती असेही त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितले आहे.