राम शिंदेंच्या ‘त्या’ टीकेला रोहित पवारांचं सडेतोड प्रत्युत्तर

8

आर्थिक खर्च वाचवण्याबरोबरच गावात असलेल्या राजकीय वादांना संपुष्टात आणण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा अन् गावच्या विकासासाठी आपल्या गावांना ३० लाखांचा विकासनिधी घ्या, अशी साद आमदार रोहित पवार यांनी घातली आहे.यावर आक्षेप घेत राम शिंदे यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे .त्या टीकेला रोहित पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिल आहे .

बिनविरोध ग्रामपंचायती व्हाव्यात म्हणून बक्षिसे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आहे अशी टीका राम शिंदे यांनी केली होती.राम शिंदे यांच्या टीकेला आता रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “कदाचित गावामध्ये गट तट असावे असा त्यांचा हेतू असावा. माझं म्हणणं आहे की, गावचा विकास करताना गट-तट बाजूला ठेवावं. सामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून राजकीय हेतू बाजूला ठेवून काम करायचं आहे.

गट-तट कळत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. ते काय बोलतात यापेक्षा लोकांना काय पाहिजे हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्याच हेतूने मी यापुढेही काम करत राहीन” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.