सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अँब्युलन्सची मागणी वाढली आहे.परभणी जिल्हा प्रशासनाला आरटीओ कार्यालयाकडून 7 अॅम्बुलन्स अधिग्रहित करून देण्यात आलेल्या आहेत. तथापि उर्वरित काही अॅम्बुलन्सधारकांकडून नागरिकांची आर्थिक लूट सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.
उद्यापासून जिल्ह्यातील ज्यादा भाडे दर आकारणार्या अॅॅम्ब्युलन्सवर कारवाई करण्याची मोहीम आरटीओ विभागाकडून राबविण्यात येणार आहे.
जादा भाडे मागणार्या अॅॅम्ब्युलन्सची माहिती नागरिकांनी तात्काळ आरटीओ कार्यालयाला कळवावी. दिलेल्या भाड्याची पावती वाहनधारकांकडून न चुकता घ्यावी. कोणतेही पेशंटची वाहतूक केल्यानंतर भाड्याची पावती देणे जिल्ह्यातील सर्व अॅम्बुलन्सधारकांना बंधनकारक करण्यात येत आहे.
याचे उल्लंघन करणार्या व जादा भाडे आकारणार्या अॅॅम्ब्युलन्सवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे देखील दाखल करण्यात येतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी एका प्रेसनोटद्वारे कळविले आहे.