लासूर स्टेशन प्रतिनिधी – संजय शर्मा
औरंगाबादेत 10 दिवसांचा लॉकडाउन लागणार अशा अफवा सध्या सुरू आहेत. परंतु, अशा स्वरुपाचा कुठलाही निर्णय मनपा आयुक्तांकडून घेण्यात आलेला नाही. काही माध्यमांनी आपल्या ऑनलाइन पोर्टलवरून औरंगाबादेत लॉकडाउन लागणार अशा बातम्या लावल्या आहेत. त्या बातम्यांमध्ये सुद्धा माहिती देण्यापेक्षा प्रश्नच विचारला जात आहे. लॉकडाउन लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या बैठकीनंतरच घेण्यात येणार असल्याची माहिती स्वतः सुनील चव्हाण यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे.
विनाकारण घाबरून गर्दी करू नका
याबाबत रविवारी संध्याकाळी सुनील चव्हाण तसेच मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय पोलीस आयुक्त निखिल गुप्ता पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी मंगेश गोदावले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता कानन येळीकर जिल्हा शल्यचिकित्सक सूंदर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. चव्हाण म्हणाले की सोमवापासून लगेच लॉक डाउन असा निर्णय झाला नाही.लॉक डाउन निर्णय नक्की घेण्यात येणार आहे.मात्र त्यासाठी लोकांना वेळ दिला जाणार आहे. त्यामुळे लोकांनी लगेच गर्दी करू नये असे चव्हाण यांनी सांगितले.
चव्हाण म्हणाले की यावेळी लॉक डाउन होणार आहे. हा लॉकडाउन अतिशय कडक केला जाणार आहे. योग्य ती सर्व कारवाई या काळात केली जाणार आहे. मात्र सोमवारपासून लगेच लॉकडाउन असा निर्णय घेतला नाही. याबाबत रुग्णवाढीच्या बाबत चर्चा केली जाणार असून डॉक्टराचे मत देखील विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे लोकांनी लगेच गर्दी करू नये असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनाची दमछाक झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी 299 आणि त्यानंतर 307, 339 आणि 351 अशी दैनंदिन वाढ होत गेली. सलग 7 दिवस तीनशेपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळल्यास लॉकडाउनची नामुष्की येईल अशी शक्यता मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी वर्तवली होती. पण, अजुनही त्याबाबतचा निर्णय झालेला नाही. औरंगाबादेत 100 टक्के लॉकडाउन लागू होणार अशा देखील अफवा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत.