मनसेच्या नेत्या रुपाली पाटील पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली आहे. पुण्यातील प्रतिस्पर्धी उमेदवार शिक्षणसम्राट आहेत. असं म्हणत त्यांनी रुपाली पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न तसेच पदवीधर मतदारसंघातील प्रचार यावर चर्चा झाल्याचं समजतंय. पदवीधरांची किती नोंदणी झाली आहे. त्यांचे काय प्रश्न आहेत. अशा बाबींवर चर्चा झाली असं रुपाली पाटील यांनी माध्यमांना सांगितलं.
कोरोना काळातील विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न घेऊन राज ठाकरे यांच्याकडे आल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. आजच्या भेटीत कोणत्या प्रश्नांवर आवाज उठवायला हवा आणि प्रश्न कसे सोडवून घ्यावेत याबद्दल चर्चा झाली असं रुपाली पाटील यांनी सांगितलं. पुण्याच्या रुपाली पाटील ह्या कायम चर्चेत असतात. त्यांनी पुणे पदवीधर मतदार संघातून प्रतिस्पर्धी उमदेवाराविरूद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.