सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी लायक नाही :काँगेसच्या खासदाराचे वादग्रस्त विधान

22

शेतकरी आंदोलनाविरोधात ज्यांनी वक्तव्ये केली, त्यांचा आत्मसन्मान संपलेला आहे.सचिन तेंडुलकरने  आपल्या मुलाला इंडियन प्रिमीयर लीगमध्ये स्थान मिळावे, यासाठी सरकारची बाजू घेतली. जनतेने याचा निर्णय घ्यावा. भारतरत्नसाठी सचिन तेंडुलकर पात्र नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे खासदार जसबीर एस. गिल यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियातून याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यावर अनेक भारतीय सेलिब्रेटिंनी सरकारची बाजू घेत परदेशी सेलिब्रिटिंना सुनावले. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये नाक न खुपसण्याचा सल्लाही दिला.

काही झाले तरी कायदे रद्द करता येणार नाही. शेतकऱ्यांनी सूचना द्याव्यात. कायद्यात तशा प्रकारचे बदल केले जातील. शेतकऱ्यांची चर्चा करण्यास नेहमी तयार आहे, असे सरकारच्या बाजूने सांगण्यात आले आहे.

अक्षय कुमारचा बुद्ध्यांक तेवढाच आहे. त्याचे म्हणणे कोणीही गांभीर्याने घेत नाही. या अशा माणसांना ट्वीट करायला लावल्यामुळे सरकारला आता शेतकरी आंदोलकांची भीती वाटू लागली आहे. हेच स्पष्ट होते, असा दावा गिल यांनी यावेळी केला.

सचिन तेंडुलकर यांच्यासह अक्षय कुमार आणि अन्य सेलिब्रेटिंवर गिल यांनी जोरदार टीका केली. एएनआय वृत्तसंस्थेशी ते बोलत होते.