सचिन वाझे प्रकरणात ताब्यात घेतलेल्या पुराव्यांची नोंद ही रेकॉर्डवर न आल्याचे तपास अधिकारी यांच्या चौकशीत समोर आले होते. त्यामुळे तपास अधिकारी ACP नितीन अलकनुरे हे देखील मुख्य साक्षीदार बनू शकतात, असंही एनआयएनं म्हटलं आहे.
पहिली मर्सिडीज सीएसएमटीजवळील एका पार्किंगमधून ताब्यात घेण्यात आली होती, त्यानंतर आणखी एक मर्सिडीज एनआयएनं शोधून काढली. पहिल्या मर्सिडीजमध्ये केरोसीन, 5 लाखांची रोख, पैसे मोजण्याचं मशिन, शर्ट सापडले होते.
सचिन वाझे प्रकरणात ठोस पुरावे असल्याचा दावा NIA करत असल्याचं कळतंय. कारण NIA या संपूर्ण प्रकरणात वाझेंनी पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अनेक गोष्टी केल्या आहेत, असं एनआयएचं म्हणणं आहे.