साईबाबांच्या मुर्ती हटवली, व्हिडीअो व्हायरल झाल्य‍‍ानंतर साईभक्तांमध्ये ऊसळली संतापाची लाट

8

एका मंदिरात साईबाबांच्या मुर्तीला हटवून त्याठिकाणी गणपतीची मुर्ती विराजमान करण्यात आली आहे. “दरम्यान साईबाबा देव नाहीत, त्यामुळेच मुर्ती हटवण्यात येत असल्याचे या व्हिडिअोमध्ये बोलले जात आहे. दिल्लीच्या दक्षिण दिल्लीमधील शहापुर जाट परिसरातील ही घटना आहे. घटनेचा व्हिडिअो व्हायरल झाल्यानंतर साईभक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येतो आहे. याप्रकरणी गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे.

दक्षिण दिल्लीतील शहापुर जाट परिसरात एका जुन्या शिवमंदिरातील साईबाबांची मुर्ती हटवून त्याठिकाणी गणपतीच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली. साईबाबांची मुर्ती त्याठिकाणावरुन काढत असतांनाचा व्हिडिअो व्हायरल झाला. ज्यामध्ये साईबाबा देव नाहीते ते मुसलमान होते असे बोलले गेले आहे.

व्हिडिअो व्हायरल झाल्यानंतर साईभक्तांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. तसेच अशाप्रकारे मुर्ती हटवून आणि साईबाबांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. परिणामी साईभक्तांकडून पोलिसांत तक्रारसुद्धा देण्यात आली आहे. पोलिस घटनेचा तपास करीत आहे.

मंदिर कमेटीने हा व्हिडिअो फेक असल्याचा दावा केला आहे. तसेच मुर्ती जुनी झाली असल्यामुळे काढण्यात आली असल्याचे म्हटले आहे. कमेटीचे अन्य सदस्य भारत पनवार म्हणाले की, साईबाबांची मुर्ती २००९ ला बसवण्यात आली होती. आता ती जुनी झाली आहे. त्याठिकाणी गणपतीची मुर्ती बसवण्यात येणार आहे, आणि स्थानिक रहिवाशांच्या ईच्छेनुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे.