उद्योजकांवर अनेक कामगारही अवलंबून असून कामगारांवरही बेकारीची वेळ येईल, सर्वांनाच याचा मोठा फटका सहन करावा लागेल, याचा विचार करुन राज्य सरकारने औद्योगिक क्षेत्राला लॉकडाऊनमधून वगळावे, असे साकडे उपमुख्यमंत्र्यांना घालण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी पत्र लिहिले आहे. लॉकडाऊनमधून औद्योगिक क्षेत्राला वगळावे अशी आग्रही मागणी केली आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लॉकडाऊन करण्याची तयारी चालवली आहे.आता पुन्हा जर उद्योग बंद ठेवण्याची वेळ आल्यास उद्योजकांचे आर्थिक कंबरडे मोडेल, अशी भीती या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
मागील लॉकडाऊनमधूनच अजून उद्योग क्षेत्र पुरेसे सावरलेले नसताना आता पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास अनेक कंपन्यांना कुलूपे लावावी लागतील, अशी भीती असोसिएशनचे अध्यक्ष जामदार यांनी व्यक्त केली आहे.