सलमान खानच्या बहिणीने हॉटेलमध्ये तोडल्या डझनभर प्लेट्स

11

सलमान खानची बहीण अर्पिता खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. आता तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती दुबईच्या एका रेस्टॉरन्टमध्ये प्लेट्स तोडताना दिसत आहे अर्पितासोबत तिच्या मैत्रिणीही असून सर्वजण मिळून प्लेट्स तोडताना या व्हिडिओत दिसत आहेत. अर्पिताने आपल्या इन्स्टा स्टोरीला हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दुबईच्या एका हॉटेलमधील हा व्हिडिओ असून अर्पिता यामध्ये खूपच आनंदी दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, अर्पिता तिच्या एका मैत्रिणीसोबत बसलेली आहे आणि टेबलवरून प्लेट खाली फेकत आहे. एका ग्रीक परंपरेनुसार, अशाप्रकारे प्लेट तोडणे शुभ मानले जाते. ऐनशिएंट ग्रीक कल्चरनुसार प्लेट तोडणे एक ट्रेडिशन असून अनेक रेस्टॉरन्टमध्ये असं हे ट्रेडिशन फॉलो केले जाते. व्हिडीओच्या दुसऱ्या भागात तिच्यासोबत इतरही पाहुणे प्लेट्स तोडताना दिसत आहेत.

अर्पिताने नुकताच काही दिवसापूर्वी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. यानिमित्ताने तिने पती आयुषसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. यावेळी आयुष तिच्या सोबत नव्हता. तिच्या लग्नाला आता ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. अर्पिताला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.