संभाजी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोलताना ‘कोरोना हा आजार नसून तो मानसिक रोग आहे. जी माणसे कोरोनाने मेली ती जगण्याच्या लायक नव्हती’, असे धक्कादायक विधान त्यांनी केले होते.
समाजाला आणि सरकारला अडचणी निर्माण होतील, अशी विधान खपवून घेतली जाणार नाहीत. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, ‘जो माणूस आंबा खाल्याने मुले होतात, असे म्हणतो, त्याच्याबाबत काय बोलायचे?समाजाच्या कोरोना विरोधी प्रयत्नांमध्ये या विधानांनी बाधा आली आहे. त्याबाबत योग्य ती यंत्रणा तपासणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करेल.