शिवराज्याभिषेक घरीच राहून साजरा करण्याचे, शिवभक्त‍ांना संभाजीराजेंनी केले आवाहन

10

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवल्यानंतर आता रुग्णसंख्येत घथ होते आहे. मात्र धोका अद्यापही टळलेला नसल्यामुळे अनेक सण-ऊत्सवांवार बंधने आली आहेत. गर्दी केल्यास कोरोना विषाणुचा प्रसार अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळासुद्धा घरी राहूनच साजरा करण्याचे आवाहन छत्रपती संभाजीराजेंनी केले आहे.

स्वराज्याचे नियम खुद्द छत्रपती शिवजी महाराजसुद्धा पाळत असत. आपणसुद्धा महाराजांच्या आदर्शांवरच चालणाचे सच्चे शिवभक्त आहोत. शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर करणे ही माझी जवाबदारी आहे. आणि माझ्यासाठी तुमचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी घरी राहूनच सोहळा साजरा करावा अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले.

काही दिवसांअगोदर मिळेल त्या वाहनाने रायगडावर दाखल व्हा असा एल्गारच संभाजीराजेंनी दिला होता. मात्र आता त्यांनी पुन्हा सर्वांना घरी राहण्याचेच आवाहन केले आहे.

मराठा समाजाच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा मी लवकरच जाहीर करेन असे त्यांनी म्हटले. तसेच मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या नाशिकच्या पदाधिकार्‍यांना त्यांनी ६ जुनका रायगडावर आमंत्रित केले आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेकदिनी संभाजीराजे काय घोषणा करणार याकडे सगलक्यांचे लक्ष लागले आहे.